मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती

मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 8, 2024, 09:15 PM IST
मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती title=

Mumbai Goa Highway :  मुंबई-गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अशातच मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  संगमेश्वर मधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्ग धोकादायक बनला आहे. येथील संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.  डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळली 

मुंबई-गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळली आहे. महाड जवळील नांगल वाडी येथे ही घटना घडली. पोलिसांकडून स्थानिकांच्या मदतीने दरड हटवण्याचं काम हाती घेण्यात आले. पावसामुळे दरड कोसळण्याची भिती असल्यामुळे  मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट

सिंधुदुर्गात उद्या रेड अलर्ट.या पावसाळ्यातील पहिला रेड अलर्ट. जिल्ह्यात उद्या विजेच्या गडगडाटास मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून "रेड अलर्ट" जाहीर करण्यात आला आहे. २ दिवसांपूर्वी जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. काही भाग वगळता अद्याप पर्यंत पावसाला म्हणावा तसा जोर नाही, आज पासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र उद्या जिल्ह्यात मुसळधार व गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

मुंबईसह उपनगरांत 24 तासांत धो धो पाऊस कोसळणार

मुंबईसह उपनगरांत पुढील 24 तासांसाठी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये...