औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि आमदारामध्ये राडा

आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप

Updated: Jan 18, 2020, 10:08 PM IST
औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि आमदारामध्ये राडा title=

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्यात राडा झाला आहे. टेंडर वरून हा राडा झाल्य़ाचं कळतं आहे. माजी नगरसेवक सुशील खेडकर यांनी आमदार संजय शिरसाठ यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि कार्यकर्त्यांसह मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

सातारा परिसरातील एका रस्त्याच्या कामाच्या टेंडरवरून आमदारांच्या कार्यालयाबाहेर हा वाद आणि हाणामारी झाली. आमदार संजय शिरसाठ यांनी टेंडर मागे घेण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वेदांत नगर पोलीस ठाण्यात खेडकर यांनी तक्रार दाखल केली आहे.