पुण्यात फ्लॉवर शो आणि फ्लॉवर फेस्टिवलचं आयोजन

पानाफुलांची आवड असलेल्यांसाठी आता एक छान बातमी.

Updated: Jan 18, 2020, 09:38 PM IST
पुण्यात फ्लॉवर शो आणि फ्लॉवर फेस्टिवलचं आयोजन

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पानाफुलांची आवड असलेल्यांसाठी आता एक छान बातमी. पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आणि फ्लॉवर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. नानाविध आकाराची रंगीबेरंगी फुलं. नजरेत भरणारी छान-छान रोपं. फुलं आणि फुलझाडांपासून साकारण्यात आलेल्या मनमोहक रचना. शोभिवंत रोपांची आकर्षक मांडणी. जिकडे बघाव तिकडं असं छान आनंददायी वातावरण. 

याठिकाणी फुलांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमा विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला एम्प्रेस गार्डनमध्ये यायला लागेल. एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षी या देखण्या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 

निसर्गप्रेमी तसंच बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे मेजवानी आहे. या महोत्सवात सुमारे साडेतीन लाख रोपं ठेवण्यात आली आहेत. फुलांचे शेकडो प्रकार इथं मांडण्यात आले आहेत. २६ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे.