पोलीस निरीक्षकाविरोधात विनयभंगाची तक्रार

ठाण्यातल्या नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 25, 2018, 10:52 PM IST
पोलीस निरीक्षकाविरोधात विनयभंगाची तक्रार title=

ठाणे : धक्कादायक आणि संतापजनक बातमी ठाण्यातून, ठाण्यातल्या नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 

गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ

विशेष म्हणजे महिला पोलीस कॉन्स्टेबलनंच पोलीस मुख्यालयातला राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिलीय. गेल्या तीन दिवसांपासून पीडित महिला पोलीस कॉन्टेबल तक्रार दाखल करण्यासाठी येत होती. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. 

पोलिसांमध्येच गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय

वरिष्ठांकडूनच शिंदेंला पाठिशी घातलं जात असल्यामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. कोल्हापूर, सांगली आणि ठाण्यातही असा प्रकार घडल्यामुळं पोलिसांमध्येच गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसतंय. शिंदेवर तातडीनं योग्य कारवाई करून वरिष्ठ अधिकारी जनतेत चांगला संदेश देतील का हा खरा प्रश्न आहे. 

आणखी काही महिला पोलीस कॉन्स्टेबल?

विशेष म्हणजे आणखी काही महिला पोलीस कॉन्स्टेबल तक्रार करण्यासाठी पुढं येण्याची शक्यता आहे. या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन 

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलंय. तसंच अत्याचार झालेल्या इतर महिलांनीही तक्रार देण्यासाठी पुढं यावं असं आवाहनही त्यांनी केलंय.