अखेर उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले; पण, इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट

Uddhav Thackeray : अखेर उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले आहे.मात्र, या निमंत्रणामुळे  इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभ राहिले आहे. या सोहळ्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 

Updated: Dec 27, 2023, 05:31 PM IST
अखेर उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले; पण, इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट  title=

Ayodhya Ram Mandir Inauguration:  अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळचं रामायणं सुरु आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनही अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रणं धाडण्यात आली आहेत. मात्र, व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि एनडीएचे कधीकाळचे सहकारी असणा-या उद्धव ठाकरेंचं (uddhav thackeray) नाव नव्हते. यामुळे त्यांना या सोहळच्याचे निमंत्रणच देण्यात आले नाही अशी चर्चा रंगली होती. आता मात्र, या चर्चेंना पूर्ण विराम मिळाला आहे. कारण अखेर  उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. उद्धव ठाकरेंना आमंत्रण मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असणाऱ्या रामायणाचा नवा अध्याय सुरु होणार आहे. याला कारण ठरणार आहे लती इंडिया आघाडी.

इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट  

उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जगभरातल्या नेत्यांसोबत भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. मात्र, यामुळे इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलंय. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते द्विधा मनस्थितीत दिसतायत.. राम मंदिर सोहळ्याला जायचं की नाही यावरुन या नेत्यांमध्ये गोंधळ दिसतोय. कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल असं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय. तर, निमंत्रण मिळाल्यास कार्यक्रमाला जाणार असं समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी म्हटलंय.

नितेश राणे यांचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आव्हान

भाजप म्हणजे पळपुटे रणछोडदास असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.. देशातील कोणत्याही साहसी लढ्यात भाजपचा सहभाग नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय. तर, राम मंदिर आंदोलनातील एकतरी पुरावा द्या असं आव्हान नितेश राणे थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दिलंय.

राज ठाकरे VVIP यादी

अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून VVIP व्यक्तींना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंचं व्हीव्हीआयपी यादीतून नाव गायब असताना राज ठाकरेंचं नाव मात्र यादीत आहे. केंद्राच्या VVIP यादीत उद्धव ठाकरे नाहीत मात्र राज ठाकरे आहेत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. उद्धव ठाकरे फक्त पहिल्या टर्मचे आमदार आहेत. तसंच राम मंदिरावरुन टीका करणा-यांना बोलावण्याचं कारण काय असं वादग्रस्त विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. त्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.