पालघरमधील मॉलला भीषण आग, ६ जणांना वाचविण्यात यश

डहाणूमधील कासा येथील विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागलीये. या मॉलमधून सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. 

Updated: Mar 14, 2018, 08:48 AM IST
पालघरमधील मॉलला भीषण आग, ६ जणांना वाचविण्यात यश

पालघर : डहाणूमधील कासा येथील विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागलीये. या मॉलमधून सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. 

एक जण मॉलमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अचानक आग लागली आग अजूनही भडकलेली आहे. 

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावर मॉल, पहिल्या मजल्यावर गोदामं आणि दुसऱ्या मजल्यावर रहिवासी घरे या इमारतीत आहेत. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.