लोटे एमआयडीसीत केंट केमिकल कंपनीला भीषण आग

मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली. 

Updated: Sep 8, 2018, 04:45 PM IST
लोटे एमआयडीसीत केंट केमिकल कंपनीला भीषण आग

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली. केंट केमिकल कंपनीला ही आग लागली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालंय. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.