पुण्यात नव्या पोलीस आयुक्तांना आरोपींकडून गोळीबार करत सलामी? भर रस्त्यात गोळीबार!

पुण्यातील वारजे भागात पोलीस चौकीजवळ आरोपीने केला गोळीबार

Updated: Dec 17, 2022, 12:10 AM IST
पुण्यात नव्या पोलीस आयुक्तांना आरोपींकडून गोळीबार करत सलामी? भर रस्त्यात गोळीबार! title=

Pune Warje Ramnagar Firing :  पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner of Pune Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारताच काही वेळातच गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे (warje) येथील रामनगरमधील (Ramnagar) वेताळबाबा चौकात गोळीबार (Firing) केला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात मोठं दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना सलामी दिल्याची चर्चा रंगली आहे. (Firing at Ramnagar in Warje Pune latest marathi news pune)

नेमकं काय घडलं?
कार्तिक इंगवले असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे. कार्तिक इंगवलेचा मित्र वेताळ बाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी  कार्तिकने त्या मित्राकडून 500 रूपये मागितले होते. त्याने पैसे नाही दिले म्हणून कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. 

 

गोळीबार करून आरोपीने तिथून पळ काढला. भर रस्त्यात गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आताच सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक (Addl DGP, CID) रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांची पुणे पोलीस आयुक्तपदी (Pune Police Commissioner) नियुक्ती करण्यात आलीय.