शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर पहिला अपघात; कारवरील नियंत्रण सुटले आणि... थरार कॅमेऱ्यात कैद

अटल सेतूवर वाहनचालकांवर 374 कॅमेऱ्यांची करडी नजर आहे. पुलाखाली देखिल 36 कॅमेरे लावले आहेत. 

Updated: Jan 21, 2024, 09:30 PM IST
शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर पहिला अपघात; कारवरील नियंत्रण सुटले आणि... थरार कॅमेऱ्यात कैद title=

Shivadi Nhava Sheva Sea Link Accident : शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर पहिला अपघात झालाय. पनवेलमधील कारचा हा अपघात झालाय. कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. यात वाहनचालक महिलेसह 4 जण किरकोळ जखमी झालेत. किरकोळ जखमी झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अपघातग्रस्त वाहनाच्या मागील वाहनाच्या कॅमेरामध्ये अपघात चित्रित झाला आहे. 

अटल सेतूवर वाहन चालवताना चूक केली तर माफी नाही

अटल सेतूवर वाहन चालवताना चूक केली तर माफी नाही. विविध अँगलनं तब्बल 374 कॅमे-यांद्वारे करडी नजर ठेवली जातेय. स्पीड कॅमे-यांसह आर्टिफिशीयल इंटेलिजन्सने युक्त कॅमेरे, सर्व्हायलन्स सिस्टीम कॅमेरे या पुलावर लावण्यात आलेत. त्याचबरोबर पुलाखाली 36 कॅमेरे लावण्यात आले असून भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे. पुलावरून जाताना वेग नियंत्रित नसेल, पुलावर विनाकारण थांबून सेल्फी काढणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागणारेय. नियम तोडल्यास गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो काढून वाहतूक विभाग आणि आरटीओला पाठवला जाईल. दंड भरण्यासाठी टाळाटाळ केल्यास गाडी विकता येणार नाही. शिवाय वाहतूक पोलिसांनी पकडल्यास व्याजासह दंड वसूल करण्यात येईल. 

अटल सेतूमुळे 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत 

12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा शिवडी-न्हावा शेवा अर्थात अटल सागरी सेतूचं उदघाटन करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यानंतर आता हा सागरी सेतू मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालाय. मोदींसोबत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. अटल सेतूमुळे 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणारे....या सेतूवर एक सेल्फी पॉईंटही बनविण्यात आलाय...तेथे प्रवासी कार लावून सेल्फी काढताना पहायला मिळाले.