पहिल्या किसान रेल्वेला हिरवा कंदील, देवळाली ते दानापूर गाडी सुरु

किसान रेल्वे आजपासून सुरु करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सल  गाडीची सुरुवात केली आहे. 

Updated: Aug 7, 2020, 01:03 PM IST
पहिल्या किसान रेल्वेला हिरवा कंदील, देवळाली ते दानापूर गाडी सुरु

जळगाव : किसान रेल्वे आजपासून सुरु करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सल  गाडीची सुरुवात केली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्धाटन केले. आजपासून ही किसान रेल्वे सुरु झाली आहे.

चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि नाशवंत उत्पादनांच्या पुरवठा करण्यासाठी किसान रेल्वेची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार आजपासून राज्यातील देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सलगाडी सुरु झाली आहे. भुसावळ रेल्वे मंडळ विभागातून ही गाडी सुरु करण्यात आली आहे. या गाडीला ऑनलाईन पद्धीतीने हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषी आधारित क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने जिथे भाजीपाला,कांदा, फळे, फुले आणि व इतर कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात उत्पादकता आहे.  याची पाटणा, अलाहाबाद, कटनी  येथे या उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या माध्यमातून  चांगला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. 
 
या कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री  सुरेश अंगडी, माननीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे,  राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, छगन भुजबळ, ऑनलाइन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी केले.