शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या देवगाव इथे मंगळवारी रात्री शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा झाली. वैतरणा नगर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व मुलींना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी दाखल करत त्या मुलींचा जीव वाचवला. 

Surendra Gangan Updated: Mar 28, 2018, 09:01 PM IST
शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा  title=

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या देवगाव इथे मंगळवारी रात्री शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा झाली. वैतरणा नगर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व मुलींना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी दाखल करत त्या मुलींचा जीव वाचवला. 

शिक्षक, वैद्यकीय अधिकारी गैरहजर

दरम्यान, यावेळी एकही कर्मचारी शिक्षक  मुख्यालयात उपस्थित नव्हते. फक्त एकच महिला अधिक्षिका शाळेवर हजर होत्या. इतकंच नाही तर गेल्या १५ दिवसांपासून मुख्यध्यापक शाळेवर नाहीत तर आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नव्हते.

नर्स, शिपाई, वॉचनमकडून उपचार

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अनुपस्थित विषबाधा झालेल्या सर्व मुलींवर नर्स, शिपाई , वॉचमन, क्लार्क यांनी उपचार सुरु केले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. एकूणच या विषबाधेमुळे आदिवासी भागातील शासकीय सेवांचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडलंय.