मुंबई: सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या' या मागणीसाठी भाजपकडून मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. चर्चगेट, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, ठाण्यात भाजपच्या नेत्यांनी लोकल प्रवासाच्या प्रवेशासाठी आंदोलन केलं. अनेक ठिकाणी आंदोलनापासून भाजप कार्यकर्त्यांना अडवण्यात देखील आलं.
भाजप नेते प्रवीण दरेकरांनी चर्चगेट स्टेशनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते लोकलमध्ये शिरले आणि त्यांनी लोकलने प्रवास करायला सुरुवात केली, काही वेळातच त्यांनी लोकल प्रवास करण्यापासून अडवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दरेकर लोकलमध्ये चढले. चर्चगेट ते चर्नीरोड असा प्रवास त्यांनी केला.
लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक, आंदोलनकर्त्यांची ट्रेन कारशेडला
पोलिसांच्या कडक बंदोबस्तातही दरेकरांनी लोकलमध्ये प्रवेश केला. या आंदोलना दरम्यान राहुल नार्वेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विना तिकीट आणि सामान्यांना प्रवासाची मुभा नसताना भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास केल्याने रेल्वे प्रशासनाकडून दंड आकरण्यात आला, दंड आकारल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. दरम्यान यावेळी काही पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचं दिसून आलं.