Sharad Pawar On Palestine : इजरायल आणि हमासचं युद्ध ७ ऑक्टोबरपासून युद्ध (Israel Hamas war) पेटलंय. गाजा पट्टीमधून हमासचं नामोनिशाण हटवण्यासाठी इस्रायलनं हल्ल्यांचा सपाटा लावलाय. आणि आता जल, जमीन आणि आकाशातून फायनल हल्ल्य़ाचं प्लॅनिंग आहे. इजरायलनं टँक, तोफा आणि सगळी अस्त्रं, शस्त्रं गाजा बार्डरवर तैनात केलीय आहेत. इत्रायलनं हमासला घेरण्यासाठी परफेक्ट चक्रव्यूह तयार केलाय. त्यामुळे हमासचं वाचणं मुश्कीलच नव्हे तर नामुमकिन आहे. अशातच आता माजी संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे.
इस्त्रायल - पॅलेस्टाईन वादाचा धोका जगाच्या शांततेला निर्माण झालाय. मूळ मालक,जमिन, घरं पॅलेस्टाईनची होती. त्यावर अतिक्रमण झालं आणि इस्त्राईल देश आला. जवाहरलाल नेहरु, इंदीरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची भूमीका पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती. हिंदुस्ताननं कधीही इतर कुणालाच मदत केली नाही. पण दूर्देवानं सध्याच्या पंतप्रधानांनी इस्त्रायलची भूमीका घेतलीय. आणि मूळ मालकांना विरोध केलाय, असं शरद पवार म्हणाले आहेत.
हमासवर हल्ला चढवण्याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू स्वतः गाजा बॉर्डरवर पोहोचले. इस्रायलच्या सैनिकांनाही त्यामुळे १० हत्तींचं बळ मिळालं. इस्रायल आता हमासविरोधात संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरलंय. इस्त्रायली सैनिकांनी हमासच्या मोठ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सैनिकांचा जोष आणखी वाढवलाय. हमासच्या नुखबा फोर्सचा बिलाल अल कुद्राला इस्रायली आर्मीनं एअरस्ट्राईक करत ठार केलं. तर इस्त्रायलवरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड अली कादी आणि एयर फोर्स चीफ मुराद अबू मुरादचाही ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात आला. इस्रायली सैन्यानं आता गाजाला पुरतं घेरलंय.
भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांचा इतिहास फार मोठा नाही. भारताने इस्रायलची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली नाही. इस्त्रायलची स्थापना झाल्यापासूनच भारताने अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार केलेला होता. मात्र, अरब देशांनी काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिला नाही, तर शस्त्रांच्या बाबतीत इस्त्रायलने नेहमीच भारताला युद्धपरिस्थितीत मदत केलीये. त्यामुळे आता भारताने इस्त्रायलला समर्थन दिलं आहे.