पुणे : Congress Leader Suresh Kalmadi : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत आज अचानक दाखल झाले. काँग्रेसकडून केंद्रातील भाजप सरकारला महागाईच्या मुद्द्यावरुन घेरण्यासाठी आंदोलन करत आहेत. अशावेळी सुरेश कलमाडी पुन्हा सक्रीय झाल्याने पाहायला मिळत आहे. तब्बल दहा वर्षानंतर सुरेश कलमाडी महापालिकेत आलेत.
पुणे महापालिकेला दाखल झाले त्यावेळी त्यांना विचारण्यात आले, 10 वर्षानंतर आला आहात. यावेळी ते म्हणाले, आता यापुढेही येत जाईन.
काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत तब्बल 10 वर्षांनी आले होते.#Congress #SureshKalmadi #Pune pic.twitter.com/IvJwnDgiuU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 5, 2022
कलमाडी हे पुण्याच्या राजकारणातील मोठे नाव होते. त्यांच्या खासदार काळात त्यांची पुण्यावर चांगली पकड होती. मात्र, आता ते फारसे राजकारण सक्रीय नाहीत. ते पुणे पालिकेत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. राष्ट्रकुल खेळ आयोजन समितीचे माजी अध्यक्ष असताना सुरेश कलमाडी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत.