नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच पोलिसांना पत्रकातून केली 'ही' विनंती

 पोलिसांना जंगलातील गस्त बंद करण्याचे आवाहन

Updated: Sep 21, 2020, 02:52 PM IST
नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच पोलिसांना पत्रकातून केली 'ही' विनंती title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून पहिल्यांदाच पोलीस आणि वनविभाग कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे. आलापल्ली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर पातानिल फाट्यावर यासंदर्भातील पत्रके आढळली आहे. या पत्रकांच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना जंगलातील गस्त बंद करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा दलातील सैनिक आदिवासी गावांमध्ये कोरोना आणत असल्याचा दावा नक्षल्यांनी केला आहे. बाहेरून येणारे सैनिक गस्त घालताना आदिवासी गावांमध्ये कोरोना पसरवत आहेत. गावांमध्ये कुठलीही सुविधा व उपचार नसल्याचा या पत्रकात उल्लेख आहे.

राज्य शासन नवे दवाखाने आणि शाळा उघडण्याऐवजी पोलीस भरती करून आदिवासी जनतेची फसवणूक करत असल्याचा उल्लेख या पत्रकातून करण्यात आलाय.

पोलीस जवानांनी कॅम्प मध्येच राहून मर्यादा पाळणे आवश्यक असल्याच्या  सल्ला पत्रकाच्या माध्यमातून नक्षल्यांना दिलाय. सल्ला न पाळल्याने या काळात मोठ्या घटना झाल्याचा दावा त्यांनी केलाय.

दुसरीकडे वनविभाग कर्मचाऱ्यांनाही जंगलातील मनमानी थांबविण्याचा इशारा नक्षल्यांनी दिलाय. जंगलातील वनोपज जनतेच्या मालकीची आहे. वनविभाग कर्मचाऱ्यांनी अत्याचार न थांबवल्यास परिणाम भोगण्यासाठी तयार राहण्याचा इशारा नक्षल्यांनी आपल्या पत्रकातून दिलाय.