गणेश चतुर्थीला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या शुभेच्छा पाठवाल? एका क्लिकवर जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 Wishes: सकाळपासूनच आपल्याला शुभेच्छा, संदेश यायला सुरुवात होईल. अशावेळी आपण इतरांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. पुढील शुभेच्छा तुम्ही एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवू शकता. 

Updated: Sep 18, 2023, 03:47 PM IST
गणेश चतुर्थीला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या शुभेच्छा पाठवाल? एका क्लिकवर जाणून घ्या title=

Ganesh Chaturthi 2023 Wishes: 19 सप्टेंबर 2023 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. या शुभ मुहुर्तावर आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. काहीजण भेटून तर काहीजण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या शुभेच्छा देतात. सकाळपासूनच आपल्याला शुभेच्छा, संदेश यायला सुरुवात होईल. अशावेळी आपण इतरांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. पुढील शुभेच्छा तुम्ही एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवू शकता. 

गणरायाच्या स्वागताची झाली तयारी , मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली, तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली

भालचंद्रा, कृपाळू तू लंबोदरा,असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना, सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे 
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला आद्य दैवत साऱ्या जगाचे

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला. प्रार्थना करतो गजाननाला, 
सुखी ठेव नेहमी... 
सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

हरिसी विघ्न जणांचे, असा तू गणांचा राजा..
वससी प्रत्येक हृदयी,असा तू मनांचा राजा..
स्वीकार गणराया तुझिया चरणी,साष्टांग दंडवत माझा..

मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो;ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना 
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

श्रींच्या चरणी कर माझे जुळले, तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.अशीच कृपा सतत राहू दे

विसर्जना दिवशी द्यायच्या घोषणा 

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

निरोप देतो आता,देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा, क्षमा असावी...

गणपती बाप्पा मोरया!