सानपाड्यात कचऱ्याचे ढिग, पहिल्या पावसानंतर दुर्गंधी

नवी मुंबईत सानपाड्यात कचरा मुख्य रस्त्यावरच फेकण्यात येत आहे.  

Updated: Jun 11, 2019, 10:12 PM IST
सानपाड्यात कचऱ्याचे ढिग, पहिल्या पावसानंतर दुर्गंधी title=

मुंबई : नवी मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. सानपाड्यात कचरा मुख्य रस्त्यावरच फेकण्यात येत आहे. त्यातच सोमवारी पाऊस झाल्याने कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ओला - सुखा कचरा आणून टाकला जात असून परिसरात प्रंचड दुर्गंधीने नागरिकांना हैराण झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हवेतील संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे परिसरात भीती पसरली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुर्लंक्ष करण्यात येत असल्याने सानपाड्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पावसाचे दिवस असल्याने या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहणार आहे. कचरा कुंड्या भरल्याने नागरिकही कचरा रस्त्यावरच फेकताना दिसत आहेत. स्वच्छ शहर, स्वच्छ नवी मुंबईचा नारा यामुळे केवळ कागदावर दिसून येत आहे.

गटारावर बर्फाची साठवण

कचऱ्याच्या ठिकाणी भटकी कुत्रीही गोळा होतात. त्यामुळे त्यांचाही येणाऱ्या जाणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेकवेळा कुत्री मागेही लागतात. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा धोका आहे. तसेच सानपाड्यात मासळी मार्केट ठिकाणी गलिच्छ जागेत आणि गटारावर बर्फही विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा बर्फ आयक्रीम, हॉलेट, शितपेयांसाठी पुरविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. दुषित पाण्यात बर्फाचे साठवणूक आणि तीही गटारावर करण्यात येत असल्याने पालिका प्रशानाकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.