मुंबई - आग्रा महामार्गावर टँकरमधून गॅस गळती, वाहतूक कोंडी

गॅसचा टँकर उलटल्याने मुंबई - आग्रा  महामार्गावर वाहतूक कोंडी

Updated: Oct 26, 2018, 07:31 PM IST
मुंबई - आग्रा महामार्गावर टँकरमधून गॅस गळती, वाहतूक कोंडी title=

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरच्या वाडीवऱ्हे इथे गॅसचा टँकर उलटल्याने गेल्या 6 तासांपासून महामार्गावर वाहतूक कोंडी लागली आहे. दोन्ही बाजूला 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंडेनचा हा 18 टन टँकर असून, या टँकरमध्ये LPG गॅस आहे. 

या टँकरमधून गॅस गळती रोखण्यात यश आलं आहे. ट्रॅफिक जाममुळं क्रेन, टँकर पोचण्यात अडचण येत आहे. तर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, डिझास्टर मॅनेजमेंट पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.