'यूपीएससी' परिक्षेत उस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात प्रथम

गिरीश बडोले हा राज्यात प्रथम आला असून देशात विसावा आलाय. गिरीश बडोले हा मुळचा उस्मानाबादचा आहे.

Updated: Apr 27, 2018, 10:44 PM IST
'यूपीएससी' परिक्षेत उस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात प्रथम  title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे निकाल घोषीत झाले असून गिरीश बडोले हा राज्यात प्रथम आला असून देशात विसावा आलाय. गिरीश बडोले हा मुळचा उस्मानाबादचा आहे. एकूण ९९० विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहे. देशात दुरुशेट्टी अनुदीप यांनी प्रथम, अनु कुमारी व्दितीय, तर सचिन गुप्ता यांनी तिसरा क्रमांक संपादन केला आहे. 

याबाबत गिरीश बडोलेशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अरूण मेहेत्रे यांनी...