प्रजासत्ताक दिनी तरुणींचे अश्लील नृत्य, तीव्र संताप

शहरातील सिडको परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणींचं अश्लील नृत्य सादर करण्यात आलं. कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा असताना चित्रविचित्र हावभावांच्या नृत्य कार्यक्रमाच्या सादरीकरणानं नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

Updated: Jan 27, 2018, 09:30 PM IST
प्रजासत्ताक दिनी तरुणींचे अश्लील नृत्य, तीव्र संताप title=

नाशिक : शहरातील सिडको परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणींचं अश्लील नृत्य सादर करण्यात आलं. कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा असताना चित्रविचित्र हावभावांच्या नृत्य कार्यक्रमाच्या सादरीकरणानं नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

नाशिकचं बिहार करायचं आहे का असा सवाल विचारला जात आहे. भाजप  पदाधिका-यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांच्या या कृतीचा मनसेच्या नगरसेवकांनी निषेध केला आहे.