नाशिक : घरातून बोलवून नेत तरुणाला मारहाण करून खून केल्याची घटना सटाना तालुक्यात नामपूरमध्ये घडली. वारिस पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेय.
वारिस रात्री घरी झोपलेला असताना तीन जण घरी आलेत. बाहेर बोलावून त्याला घेवून गेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. रस्त्यावर त्याचा मृत देह सापडला. घटनेची मिळताच वारिस कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. वारिस यांच्या हातपायावर आणि डोक्याला गंभीर जखमा होत्या. त्याला रात्री २ वाजता नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
घटनेनंतर नामपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस यांच्यासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.