विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकाची धिंड

महाविद्यालयीन विदयार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकाची चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली. जनता कृषी महाविद्यालयातील बाबूलाल इंगळे या लिपिकाला अटक करण्यात आलीये.

Updated: Jan 10, 2018, 08:45 AM IST
विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकाची धिंड

अमरावती : महाविद्यालयीन विदयार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकाची चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली. जनता कृषी महाविद्यालयातील बाबूलाल इंगळे या लिपिकाला अटक करण्यात आलीये.

शरीर सुखाची मागणी

उद्यान विद्या विभागाच्या 21 वर्षीय विद्यार्थीनीला रविवारी महाविद्यालयात परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी फोन करून  बोलावून घेतलं. तिला दिवसभर महाविद्यालयात तातकळत ठेवून सायंकाळी शरीर सुखाची मागणी केली, असा आरोप आहे. 

आरोपी इंगळे याला मारहाण 

विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी आणि युवा विद्यार्थी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी इंगळे याला मारहाण केली. जनता कृषी महाविद्यालयापासून ते गाडगे बाबा मंदिरापर्यंत धिंड काढली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून क्लार्क बाबूलाल इंगळे, प्राध्यापक सुनील  विल्हेकर यांच्या विरोधात गडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.