सोनं खरेदी करावं की नको! आज सोनं 69 हजारांच्या पुढे, तर चांदी 76 हजारांवर

Gold Silver Price : सोनं चांदीच वाढते दर पाहता सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. आजही सोन्याचं दर 69 हजारांच्या पुढे गेले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 22, 2024, 09:47 AM IST
सोनं खरेदी करावं की नको! आज सोनं 69 हजारांच्या पुढे, तर चांदी 76 हजारांवर  title=

Gold Silver Price Today in Marathi: गेल्या काही दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्याचे भाव सध्या बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या तेजीमध्ये आज म्हणजेच 22 मार्च रोजी मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या वाढत्या दरामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. परिणामी सोनं किंवा चांदीचे दागिने खरेदीकरायचे कि नाही असा प्रश्न खरेदीकरांना पडला आहे. 

देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे नागपूर सराफ बाजारात 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव तीन टक्के जीएसटीसह 69,300 रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, सोन्याची सततची वाढ इथेच थांबणार नसून लवकरच 70 हजारांचा आकडा गाठणार असल्याचे मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे. मार्च महिन्यात सोन्याच्या कमालीची वाढ झाली आहे. दर तीन टक्के जीएसटीसह 4120  रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  गुरुवारी सकाळच्या सत्रात अचानक  1200 रुपयांनी वाढून  सोनं 67,200 रुपयांवर पोहोचले. दुपारी 100 रुपयांची वाढ होऊन भावपातळी 67,300 रुपयांवर पोहोचली. त्यानंतर 100 रुपयांवर घसरण होऊन भाव पुन्हा 67,200 रुपयांपर्यंत उतरते.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 60,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तेच पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,830 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,360 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,830 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,360 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66,830 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 66,360 रुपये आहे.

माार्चमधील दर

दिनांक  दर 
1 63,200
2 63,900
5 65,100
9 65,900
18 65,700
18 66,000
20 66,000
21 67,200

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘बीआयएस केअर ॲप’ ॲपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच संबंधित तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक फसवणूक झाल्याचे आढळल्यास, ग्राहक त्याबाबत ॲपद्वारे तत्काळ तक्रार करू शकतात. किंवा ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला दाखल केलेल्या तक्रारीची तत्काळ माहिती मिळेल. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते. 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 कोरलेले., 21 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दागिन्यांमध्ये 875 लिहिलेले असते. 18 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दागिन्यांची किंमत 750 लिहिलेले असते. 14 कॅरेट शुद्ध सोन्याचा मुलामा 585 लिहिलेले असते.