Good News : राज्यात या सात जिल्ह्यांत मिळणार सीएनजी

महराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये आता सीएनजी उपलब्ध होणार आहे.

Updated: Sep 7, 2018, 08:03 PM IST
Good News : राज्यात या सात जिल्ह्यांत मिळणार सीएनजी

नाशिक : नाशिकसह राज्यातल्या सात जिल्ह्यांसाठी एक खुशखबर आहे. नाशिक, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आता सीएनजी उपलब्ध होणार आहे. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियंत्रण बोर्डाने देशात १७४ जिल्ह्यात सीएनजी उपलब्ध करण्यास  परवानगी दिली आहे. येत्या ५ वर्षात देशभरात ७५० जिल्ह्य़ांमध्ये सीएनजी उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत.