जीएसटीचा भिंवडीतील यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका

देशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीप्रणाली आज एक महिना पूर्ण झालाय. मात्र, भिवंडी शहरातल्या ८० टक्के उद्योगांना नव्या करप्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. 

Updated: Aug 1, 2017, 02:49 PM IST
जीएसटीचा भिंवडीतील यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका  title=

भिवंडी : देशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीप्रणाली आज एक महिना पूर्ण झालाय. मात्र, भिवंडी शहरातल्या ८० टक्के उद्योगांना नव्या करप्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. 

 जीएसटी प्रणालीमुळे देशातली किचकट अप्रत्यक्ष करप्रणाली मोडीत निघाली.  जीएसटीमुळे भिंवडीतल्या यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका बसलाय. यंत्रमागाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातल्या ८० टक्के उद्योगांना नव्या करप्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. 

यंत्रमागधारकांच्या माहितीनुसार त्यांचा धाग्यावरील जीएसटीस विरोध नाही. त्यानंतर जॉब वर्क करून कच्चा कपडा बनविणाऱ्या छोट्या कारखानदारांवर, सायझिंग व्यवसाय आणि विक्री होणाऱ्या तयार कपड्यावर लावला जाणारा जीएसटी जाचक आहे, असं यंत्रमाग उद्योजकांचं म्हणणं आहे.  याप्रणाली धनिकांचा फायदा आणि गरीबांचा तोटा होत असल्याचीही ओरड होत आहे.