भाजप हरिभाऊ बागडे यांना डावलणार असल्याचे संकेत, नवीन चेहऱ्याला पसंती

हरिभाऊ बागडे यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

Updated: Sep 30, 2019, 04:45 PM IST
भाजप हरिभाऊ बागडे यांना डावलणार असल्याचे संकेत, नवीन चेहऱ्याला पसंती title=
Pic Courtesy : Facebook

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच आणखी दोन नावे वगळणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप मराठवाड्यात नवे चेहरे देण्याची शक्यता आहे. फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यांच्याऐवजी नवा उमेदवार देण्यात येणार असल्याची माहती सूत्रांनी दिलीय. तर उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर माजलगावमधून आर. टी. देशमुख यांनाही उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.