सोनू भिडे, नाशिक:-
अनैनिक संबध कधी जीवावर बेततील याचा भरवसा नाही. प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला कधी जनतेच्या तावडीत सापडून तर कधी प्रेयसीच्या नातेवाईकांच्या हाती लागून पब्लिक मार पडतो... मात्र नाशिकमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या ३६ वर्षीय (36 year) प्रियकराचा मृत्यू (Death) झाला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकमेकांवर होते प्रेम
नाशिकच्या हिरावाडी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे म्हसरूळ मधील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबध होते. हे दोघंही एकमेकांवर जिवापार प्रेम करत होते. बऱ्याच दिवसांपासून त्याच प्रेम प्रकरण सुरु होते. प्रेयसीचा नवरा घरी नसताना प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असे. ७ ओक्टोबर रोजी नवरा घरी नसल्याने प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी म्हसरूळ येथील तिच्या घरी गेला होता.
या कारणाने झाला मृत्यू....
७ ओक्टोबर रोजी नवरा घरी नसल्याने प्रियकर (boyfriend) आपल्या प्रेयसीला (sweetheart) भेटण्यासाठी थेट तिच्या घरी गेला होता. यावेळी दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र,त्याचवेळी अचानक घराची बेल वाजली आणि दारात बघितले तर प्रेयसीचा नवरा दिसला. आता आपले बिंग फुटेल या भीतीने दोघंही घाबरले होते. आपण पकडले जाऊ या भीतीने यासाठी प्रियकराने थेट घराच्या तिसर्या मजल्यावरून खिडकीतून खाली उडी मारली. मात्र यात प्रियकराला गंभीर दुखापत झाली होती. उपचारीकारिता त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर इजा असल्याने त्याचा मंगळवारी (१८ ऑक्टोबर) मृत्यू झाला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasarul Police Station) अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.