जालना: राज्यात दिवसागणित कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नक्कीच चिंतेचा विषय आहे. प्रत्येकानं संसर्ग टाळण्यासाठी सतर्क राहून काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
आज मनसुख मांडवीय यांच्या सोबत 2 तास बैठक झाली यात 5 राज्याचा आढावा झाला.राज्याततील स्थिती आणि आढावा या बैठकीत घेण्यात आला. आज 1 लाख 73 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. 5 हजार 400 लोकांना ऑक्सिजन लागणारे रुग्ण आहे 13 टक्के लोक माईल्ड स्थितीत आहे
ICU बेड 38 हजार आहेत. आयसीयू बेड आणि16 हजार व्हेंटिलेटर बेड राज्यात उपलब्ध आहे. 1 लाख 34 हजार ऑक्सिजन बेड राज्यात उपलब्ध आहेत. टेस्टिंग, ट्रेसिंग,ट्रीटमेंट, वाढवण्याच्या मांडवीय यांच्याकडून राज्याला सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती टोपेंनी दिली.
ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका सर्वात जास्त असल्याचंही सांगितलं आहे. जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे.
एक पिक पॉईंट आहे जिथे कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढतात त्यानंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात येते. ही परिस्थिती इतर देशांमध्येही आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली की, निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार केला जाईल.
राज्यात आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण 15 टक्क्याहून अधिक आहे. अशावेळी 15 ते 20 दिवसांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात निर्बंध शिथिल करण्याचा विचार केला जाऊ शकतो.