नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत ऑनलाइन बाजू मांडणार आहेत. जिल्हा न्यायाधीश हांडे कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

Updated: Feb 5, 2022, 04:19 PM IST
नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी title=

सिंधुदुर्ग : Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत ऑनलाइन बाजू मांडणार आहेत. जिल्हा न्यायाधीश हांडे कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार दाखल झाले आहे. आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. त्याआधी नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी न्यायालयात आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, आता सरकारी वकीलांनी वेळ मागितली होती.

सरकारी वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज म्हणणं मांडायला पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली. त्याचवेळी सरकारी वकील यांनी आमदार नितेश राणे यानी सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे याच्या समोर नको, अशी मागणी केली. 

तसेच सरकारी वकीलांचे म्हणणे आहे की, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशासमोर सुनावणी सुरु आहे, त्यांच्या समोरच सुनावणी घ्यावी, अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली. 

जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे हे शरण आल्यानंतर कस्टडीमध्ये घेतलेले नाही, अशी थेट तक्रार सरकारी वकिलांनी केली आहे.