मुंबई : रविंद्र मराठे यांच्या वतीने पुणे विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आलाय. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मराठेंच्या अटकेवरून उदभवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर न्य़ायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे. विशेष करून बँकिंग क्षेत्रातून मराठे तसेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या इतर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान आज होणाऱ्या जामीनाच्या अर्जाविरोधात काही ठेवीदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितलीय, शनिवारी संध्याकाळी सुटीच्या दिवशी न्यायालयाचं कामकाज करून त्यांच्या कोठडीत बदल करून त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी न्यायालयावर दबाव टाकण्यात आल्याची ठेवीदारांमध्ये भावना आहे.