नाशिकमध्ये जोरदार पावसाचा तडाखा, बारावीपर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहीर

Heavy rains in Nashik :जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोदावरीला मोठा पूर आला आहे. या ठिकाणी  रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर जिल्हा शाळा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बारावीपर्यंतच्या शाळांना आज सुट्टी (School Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

Updated: Jul 12, 2022, 09:42 AM IST
नाशिकमध्ये जोरदार पावसाचा तडाखा, बारावीपर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहीर  title=

नाशिक : Heavy rains in Nashik :जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोदावरीला मोठा पूर आला आहे. या ठिकाणी  रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर जिल्हा शाळा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बारावीपर्यंतच्या शाळांना आज सुट्टी (School Holiday) जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस अद्यापही कायम आहे. यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यास रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शाळा आज बंद राहणार आहेत. 

राज्यात 14 जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. हा रेड अलर्ट विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. तर  नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंट अलर्ट दिला आहे. 

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्यानं आता गोदावरीची पूरस्थिती आणखी गंभीर होतेय. जिल्ह्यातल्या महत्वाच्या धरणांमधून विसर्ग सुरु असल्यानं शहरातल्या रामकुंड परिसरातल्या मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. प्रशासनानं नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातही पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला पाऊस होत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून 72 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सूरू झालाय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीये, त्यामुळे नांदूरमधमेश्वर धरणातून 72 हजार क्युसेक पाणी मराठवाड्याकरता गोदावरी नदीतून सोडले आहे.  

गेल्या पाच दिवसांपासून निफाड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय, शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तर सुरगाणा तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नार नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय. परिणामी दोन्ही राज्यांमधळी वाहतूक ठप्प झालीय. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

मुसळधार पावसामुळे नाशिकच्या सप्तशृंग गडावर मुसळधार पाऊस बरसत असून पाण्याच्या प्रवाहाने दगड, माती वाहून आल्यानं मंदिरातून खाली उतरणारे 6 भाविक जखमी झाले.