मुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकणात मुसळधार पडण्याचा इशारा

Heavy rains in Mumbai : बातमी पावसाची. पुढील दोन ते तीन तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.  

Updated: Jul 13, 2022, 09:07 AM IST
मुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकणात मुसळधार पडण्याचा इशारा title=

मुंबई : Heavy rains in Mumbai : बातमी पावसाची. पुढील दोन ते तीन तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईतील उपनगरांत रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे.  तर पालघर तसंच पालघर भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. दादर, सायन, वांद्रे, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 2 ते 3 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. तसेच मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिरानं सुरु आहे.

कोकण भागात पावसाचा इशारा

Rain alert in  Konkan area : ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच चक्रीवादळामुळे येत्या चार ते पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. आयएमडीने म्हटले आहे की, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील घाट भागात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. ओडिशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच चक्रीवादळ पसरल्याने पावसाची शक्यता अधिक आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलंय..जिल्हातील सफाळे, केळवे, मनोर या भागात जोरदार पाऊस आहे. सूर्या आणि वैतरणा नद्या ही दुथडी भरून वाहतायंत..यामुळे नदीकडच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले तीन दिवस पाऊस पडत आहे. हवेत गारठा निर्माण झाला आहे. तर शेतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

रायगडमध्ये पुरात अडकलेल्या गुराख्याला कोलाड येथील बचाव पथकानं सुरक्षित बाहेर काढले. नागोठणे जवळील चिकणी येथील एकजण बक-या चारायला गेला होता. पावसाचा जोर वाढताच आंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं  पाणी शेतात शिरलं.या पाण्यात तो आणि त्याच्या बक-या अडकल्या. प्रशासनाला याची माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करुन गुराख्यास‍ह 20 बकऱ्यांनाही सुखरूप बाहेर काढ्यात आले.