close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

औरंगाबाद पोलिसांची हायटेक तयारी, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर

 औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणारेय. 

Updated: Sep 4, 2017, 07:31 PM IST
औरंगाबाद पोलिसांची हायटेक तयारी, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर

औरंगाबाद :  औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणारेय. 

उद्या अनंत चतुर्दशी असल्याने शहरात विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असणार आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मिरवणुकीवर ड्रोनची नजर असणार आहे. 

चार स्पेशल ड्रोन कॅमेरे मिरवणूक आणि विसर्जन करण्याच्या ठिकाणी तैनात असणारेय. हे कॅमेरे प्रसंगी मिरची पावडर सुद्धा आकाशातून टाकू शकणारेय. सोबतच पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणात असणार आहे.