राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 6330 रुग्ण वाढले

राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले

Updated: Jul 2, 2020, 09:10 PM IST
राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 6330 रुग्ण वाढले title=

मुंबई : आज राज्यात कोरोनाच्या 6330 रुग्णांची वाढ झाली आहे. आज राज्यात 125 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या 48 तासात 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 15 रुग्णांचा मृत्यू हा मागील कालावधीतील आहे. राज्यात मृत्यूदर आता 4.38 टक्के झाला आहे. 

आज राज्यात 8018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1,01,172 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 10,20,368 रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले, ज्यापैकी 1,68.626 रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट आता 54.21 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 5,72,032 जण होम क्वांरटाईन आहेत तर 41,741 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 77,260 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ज्यांचावर उपचार सुरु आहे.