नासाला 100 कोटींना भांडं विकण्याचं आमिष दाखवत फसवणूक, पुण्यातील मास्टर माईंडला अटक

100 कोटींचं आमिष देणारा मास्टरमाईंड निघाला निलंबित रेल्वे पोलीस अधिकारी

Updated: Aug 16, 2022, 01:55 PM IST
नासाला 100 कोटींना भांडं विकण्याचं आमिष दाखवत फसवणूक, पुण्यातील मास्टर माईंडला अटक title=

झी मिडिया, पिंपरी चिंचवड : आर. पी. धातूचं मौल्यवान भांडं नासाला विकून मोठी रक्कम मिळवून देण्याचं आमिष दाखवत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणातील मास्टर माईंडला हिंजवडी पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे मुख्य सूत्रधार हा रेल्वे पोलीस दलातील निलंबित अधिकारी आहे. रॉबर्ट रोझीरिओ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

पुण्याच्या सुस परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला तीन महिला आणि तीन पुरुषांच्या टोळीने काही महिन्यांपूर्वी 49 लाख रुपयांना फसवलं होतं. याबाबत फिर्यादींनी हिंजवडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. आरोपींनी आर. पी. हे किरणोत्सारी पदार्थ वित्सर्जित करणारे भांडं असून ते नासाला विकायचं असल्याचं सांगितलं. भाभा अटॉमीक सेंटर आणि आर बी आय यांच्यात करार झाल्याच सर्टिफिकेटही आरोपींनी फिर्यादींना दाखवलं. त्यामध्ये भांड्याची किंमत 100 कोटी दाखवण्यात आली होती.

फिर्यादींना शेअर मार्केटमध्ये मोठी रक्कम मिळवून देतो असं सांगत शेती कमी भावावमध्ये विकण्यास भाग पाडलं. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आरटीजीएसद्वारे 37 लाख रुपये आणि 12 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. एकूण 49 लाख रुपये आरोपींनी लुबाडले. मात्र आश्नासनानुसार त्यांनी एकही रूपया परत केला नाही. 
 
हिंजवडी पोलिसांनी सोनाली जाधव, पूजा गरुड, संगीता नगरकर, मेहुल गांधी, सतीश मुकेकर यांना अटक केली. यामागच्या खऱ्या सुत्रधाराला पकडणं अवघड जात होतं. कारण रॉबर्ट रोझीरिओ हा सतत मोबाईल बदलत होता. सतत राहण्याचं ठिकाणही बदलत होता. हिंजवडी पोलिसांनी रॉबर्टला अटक केली असून अजून किती लोकांची यांनी फसवणूक केली याचा तपास पोलीस करत आहेत.