Historical Assets : घराचे खोदकाम करताना सापडल्या 10 तोफा; 300 वर्ष जुन्या तोफांचा पंचनामा

नंदुरबार जिल्ह्यातील पडळदा गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्यात. एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम केलं जात होतं. या खोदकामावेळी 10 तोफा आणि इतर ऐतिहासिक साहित्य सापडले. या तोफा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज आहे. 

Updated: Jan 10, 2023, 10:11 PM IST
Historical Assets : घराचे खोदकाम करताना सापडल्या 10 तोफा; 300 वर्ष जुन्या तोफांचा पंचनामा title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : वाढत्या लोकसंख्येसह नविन बांधकामांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, नविन बांधकाम करत असताना अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुला सापडत आहेत. काळाबरोबर जमीनीत पुरला गेलेला इतिहास नव्याने समोर येत आहे. नंदुरबारमध्ये(Nandurbar district) घराचे खोदकाम करताना दहा तोफा(Historical guns) आणि इतर ऐतिहासिक साहित्य(Historical Assets) सापडले आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या तोफा पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली. 

नंदुरबार जिल्ह्यातील पडळदा गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्यात. एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम केलं जात होतं. या खोदकामावेळी 10 तोफा आणि इतर ऐतिहासिक साहित्य सापडले. या तोफा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज आहे. चार ते पाच फूट लांबीच्या या तोफा पंचधातूच्या असून त्यात एक तोफ पितळीची आहे. या तोफांचे वजन जवळपास सह क्विंटल आहे. प्रशासनानं या तोफांचा पंचनामा केला असून, या तोफा गावातच ठेवण्याचा आग्रह गावकऱ्यांनी धरला आहे. 

नेमका काय आहे प्रकार

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या पडळदा या गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्या आहेत. गावातील अरुण पाटील यांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले होते.  त्यादरम्यान खोदकाम करताना दहा लहान तोफा व इतर साहित्य सापडले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. या छोट्या तोफां संदर्भात माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह पुरातन विभागाला पाठवण्यात आली आहे. या तोफा जवळपास साडे तीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. चार ते पाच फुट आकारांच्या या जवळपास दहा तोफा असुन या तोफा पंचधातुच्या असुन एक तोफ ही पितळी आहे. या तोफांचे वजन जवळपास सह क्विंटल आहे. गावकऱ्यांनी सापडलेल्या या तोफा गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.