नांदगाव स्थानकाजवळ हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले

हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात

Updated: Jun 2, 2019, 10:50 AM IST
नांदगाव स्थानकाजवळ हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले title=

नाशिक: नांदगाव स्थानकाजवळ रविवारी सकाळी हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळांवरून घसरल्याचा प्रकार घडला. ही एक्सप्रेस बरेलीहून मुंबईला येत होती. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. हॉलिडे एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्याचे चाक तुटल्याने हा प्रकार घडला. चाक तुटले तेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला. चाक तुटलेला डबा वेगळा करण्याचे काम सुरू आहे. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या दुर्घटनेमुळे नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.