राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने 'या' जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Jalna School Holiday: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने (Rajma) जालना जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

Updated: Jan 12, 2024, 09:37 AM IST
 राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने 'या' जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर title=

Rajmata Jijau Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांची 12 जानेवारी या दिवशी तारखेनुसार जयंती  साजरी केली जाते. यंदा जिजाऊंची 426 वी जयंती साजरी होत आहे. जिजाऊंच्या जयंती निमित्ताने बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथेील त्यांच्या जन्मस्थानी शिवभक्त मोठ्या संंख्येने अभिवानद करण्यासाठी येतात. या निमित्ताने  सिंदखेडराजा येथे अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. या उत्सवानिमित्ताने होणारी गर्दी विचारात घेता 12 जानेवारी गोरी  जालना जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जालना जिल्हा परिषदेतर्फे सुटी संजर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

शिवबांच्या जडणघडणीमध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांचा मोलाचा वाटा होता. शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊ माता यांच्या जयंतीला (Rajmata Jijau Jayanti) देखील शिवभक्त मोठी गर्दी करतात. यामुळे बुलढाण्यासह आपसासच्या जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने  सिंदखेडराजा येथे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने  सिंदखेडराजा येथे होणाऱ्या उत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातील (Jalna District)  सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यातील (Jalna District) खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/अशंतः अनुदानित/स्वयं अर्थ सहाय्यित शाळा/जि.प.प्रा./कें.प्रा.शा./जि.प. प्रशाला/कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत जिल्हा परिषद जालना (Zilla Parishad Jalna) यांना 12 जानेवारी रोजी मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने एक दिवसीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

माँसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी मोठा उत्सव

12 जानेवारी 1598 मध्ये जिजाऊंचा जन्म  बुलढाण्यातील सिंदखेडराजा गावामध्ये झाला. जिजाऊंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी  माँसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी मोठा उत्सव साजरा केला जातो. जिजाऊ या लघुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या कन्या आहेत. दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये जिजाऊ पारंगत होत्या.  जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखालीच छत्रपती शिवरायांना बालवयात युद्ध कलांचे प्रशिक्षण मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सवानिमित्ताने मोठा उत्सव  साजरा केला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ माँसाहेबांची पूजा करून माँसाहेबांना अभिवादन करण्यात येते. जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. जिजाऊंच्या जन्मस्थानापासून ते जिजाऊ सृष्टीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येते. जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लाखो जिजाऊभक्त सिंदखेडराजात दाखल होतात.