गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात (Washim district) भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे (Horrific accident of speeding car). या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर वनोजा इंटरचेंज जवळ हा अपघात घडला आहे. गुजरात वरून नागपूर जाणारी भरधाव कार अपघातग्रस्त झाली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील वनोजा इंटर चेंज जवळील सात किमी अंतरावर हा अपघात झाला. संभाजीनगर येथून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने संरक्षण कठड्याला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघतात गुजरात येथील सीमा गोयल (50 वर्षे), श्याम दास गोयल (55 वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात घडला त्यावेळी वनोजा येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील राऊत समृद्धी मार्गावरून प्रवास करत होते. त्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत केली. तात्काळ जखमींच्या नातेवाईकांना फोन करुन अपघाताची माहिती दिली. त्यांच्यावर शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले. यावेळी अर्ध्या ते एक तासानंतर रूग्णवाहीका उशिरान पोहचल्याने जखमींना मदत मिळण्यास विलंब झाला. समृद्धी महामार्ग तातडीने मदत मिळण्याचा प्रशासनाने केलेल्या दाव्यावर यामुळे प्रश्न उपस्थित झाले आहे. माहामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपघातग्रस्तांना लवकर मदत देण्याची मागणी केली जात आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर मुंबई अंतर कमी झाली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी या रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर हा रस्ता सर्वसामान्यासाठी खुला करण्यात आला. मात्र, तेव्हापासून आजपर्यत या महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे.