Nashik Accident : नाशिकमध्ये नांदगावजळ भीषण अपघात झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बसने अल्टो कारला धडक दिली. या भीषण अपघातात अल्टो कारमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एसटी चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्यााचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे.
मनमाड बस डेपोची ही एसटी बस (एसटी क्रमांक एम एच 14 बीटी 4498) होती. चाळीसगाव येथून ही बस मनमाडच्या दिशेने प्रवास करत होती. यावेळी नांदगाव जवळ या एसटी बसने अल्टो कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात केला. पळसे येथून भडगाव कडे जात असलेल्या अल्टो कारला एसटी बसने धडक दिली.
एसटी बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोन महिलांसह एक पुरुष प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या कारमधील एक तीन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले आहे. असुन त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात येत आहे या अपघाताचे वृत्त समजताच आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. यावेळी गौरव बोरसे रुग्णवाहिका घेऊन हजर झाले.
जखमींना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आवे. मात्र, डॉक्चरांनी तिघांना मृत घोषीत केले. शुभम संतोष नलावडे (वय वर्षे 24), वंदना संतोष नलावडे, (वय वर्षे 40) आणि निकिता मनोज शिंदे ( वय वर्षे 22) अशी मृतांची नावे आहेत.
यावेळी नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे सह हवालदार संदीप बच्छाव पोलिस नाईक नंदू चव्हाण ठाणे अंमलदार राजेंद्र मोरे सह मुददसर शेख घटना स्थळी हजर होवून पंचनामा केला आहे. एसटीच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन याबाबत शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे .
भंडा-यातील देव्हाडी उड्डाणपुलावर एका भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका गंभीर होता की कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.
सोलापूरच्या देगावजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी आहे... सोलापूर - मंगळवेढा महामार्गावर हा अपघात झाला.