मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येत आहे. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊन दुसरीकडे उन्हाळा, अशावेळी मुलांना कसे गुंतवून ठेवता येईल? याचाच विचार आता पालकांना सतावू लागला आहे. सर्व मुले उन्हाळ्याच्या सुट्टीच्या प्रतीक्षेत असतात. सुट्ट्यांमध्ये मनसोक्त खेळणे, मजा लूटणे, नवनवीन गोष्टी शिकणे अशा अनेक गोष्टी मुलांना करता येतात. त्यामुळे वर्षभर या सुट्ट्यांची वाट पाहिली जाते. आता मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या नियमांमुळे मुलांच्या या आनंदावर विरजण पडले आहे. (how to haddle and keep buzy our child in this lockdown and this long summer vacation)
सतत घरात राहून मुलांना कंटाळवाणे वाटू लागला आहे. अशावेळी मुलांचे मन कसे गुंतवून ठेवता येईल याविषयी पुण्यातील खराडी येथील मदरहुड हॉस्पीटलचे नवजात शिशू आणि बालरोग तज्ज्ञ आणि सल्लागार तुषार पारीख यांच्याकडून या काही टिप्स् जाणून घेऊया. लॉकडाऊनमुळे आता मुले मैदानावर बाहेर जाऊन खेळू शकणार नाहीत. त्यांना घरच्या घरीच खेळावे लागणार आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांचा वेळ घालविण्यासाठी तसेच घरच्या घरी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी यावर भर दिला पाहिजे.
- आपल्या मुलांना जबाबदा-या द्या :
आपल्या मुलास खेळण्यांमध्ये व्यस्त ठेवणे आपणास अवघड आहे काय? मग, काळजी करु नका त्यांना त्यांच्या वयानुसार जबाबदाऱ्या देऊन त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करा. आपण त्यांना सँडविच, भेळ, ज्युस अशा सोप्या रेसिपी असलेला खाऊ करण्यास सांगू शकता जेणेकरुन त्यामध्ये त्यांना नवीन गोष्टी शिकता येतील आणि स्वतः केलेल्या पदार्थाची चव चाखता येईल.
मुलांना त्यांची खोली स्वच्छ करण्यास सांगू शकता. त्यांना संपूर्ण घराचे निरीक्षण करण्यास सांगा. घरात कुठेही धूळ किंवा कचरा नाही याची खात्री करा. विजेचा अपव्यय होणार नाही हे सुनिश्चित करण्यास सांगा आणि त्यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडल्यास त्यांना बक्षीसह द्या. हे आपल्या मुलांना व्यवस्थापनाची कौशल्ये शिकण्यास, निर्णय घेण्यास मदत करण्यास आणि पर्यावरणासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात. हे आपल्या मुलांची कार्यक्षमता वाढेल.
- घरी कॅम्पिंग :
लॉकडाऊनमध्ये घरीच कॅम्पिंगची योजना आखू शकता. कॅम्पसारखे वातावरण तयार करा आणि तुम्ही देखील मुलांसह आनंद घ्या. आपली मुलं बाहेर हट्ट करणार नाहीत. तसेच, आपण मुलांकरिता पुस्तके, खेळ आणि हस्तकला आणि चित्रकला तसेचेच विविध छंद जोपासण्याकरिता लागणाऱ्या वस्तू घरात आणून ठेवू शकता. ज्यामुळे त्यांना कंटाळा येणार नाही
- मुलांसमवेत दर्जेदार वेळ घालवा :
आपणास घरुन काम करणे आवश्यक आहे आणि लहान मूलसुद्धा घरी आहे म्हणून आपण एकत्र मिळून काम करा आणि मुलांनाही पुरेसा वेळ द्या. आपल्या मुलाला जे आवडते ते करा. आपल्या मुलाबरोबर गाणे, पुस्तके वाचा, घरी मैफिली करा, कोडे सोडवा, नृत्य करा, स्वयंपाक करा, बेकींग करावे, बागकाम निवडा, फॅब्रिक पेंटिंग करा, वाद्य वाजवा, कथा लिहा, इमारतीच्या आवारात सायकल चालवा, घरी व्यायाम करा, माहितीपट पाहा, चित्रपट पहा आणि खेळ खेळा अशा अनेक गोष्टी तुम्हाला मुलांसोबत करता येतील.
यामुळे मुलांशी असलेले आपले बंध आणखी मजबूत होतील आणि नात्याची विण आणखी घट्ट होईल. उन्हाळ्यातील काही सुट्टीचे नियम तयार करा. मुलांच्या चुकीच्या वागण्याकडे लक्ष देण्याचा चूक दुरुस्त करण्यास सांगा. एक छान वेळापत्रक आखा. जेवणात किंवा झोपेच्या वेळेत कोणतेही बदल होणार नाहीत याची खात्री करुन घ्या. मुलं त्यांची कामे पूर्ण करतात हे पहा. आपल्या मुलांवर वेळापत्रक लादण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचा स्क्रीन वेळ मर्यादित करा.
- सुट्टीचे नियोजन करा
मुलांनादेखील त्यांच्या सुट्टीचे नियोजन आखु द्या. त्यांना कोणते उपक्रम करण्यास आवडतील याची खात्री करुन घ्या. आठवड्याच्या शेवटी केले जाऊ शकतात असे उपक्रम त्यांना स्वतः निवडू द्या. ही उन्हाळी सुट्टी देखील आपण घरबसल्या कशी विशेष करुन शकतो याविषयी मुलांना कल्पना द्या. नवीन गोष्टी शिकण्यास, जबाबदार नागरिक बनण्यास आणि त्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळण्यास नक्कीच मदत करेल. मुलांना केवळ नियमांमध्ये बांधून न ठेवता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आनंद लूटण्याची संधी द्या. आपल्या मुलांना आवश्यक ते स्वातंत्र्य द्या.