अमरावतीत रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगा तर कोल्हापुरात तुटवडा

राज्यात कोरोचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ आहे.  (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही जास्त झाली आहे.  

Updated: Apr 15, 2021, 12:34 PM IST
अमरावतीत रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगा तर कोल्हापुरात तुटवडा title=
संग्रहित फोटो

अमरावती / कोल्हापूर : राज्यात कोरोचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ आहे.  (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही जास्त झाली आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असताना औषधाचा तुटवटा जाणवू लागला आहे. तसेच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने बेडही मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीत  रेमडेसिवीर चा तुटवटा जाणवत आहे.  रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) रांगा दिसून येत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातही  रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे.

अमरावतीत चार तासांपासून कोरोना रुग्णांचे नातेवाईक ताटकळत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई पुणे नागपूर सह आदी जिल्ह्यात  रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर पुण्यामध्ये अक्षरश:  रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Queues for Remedesivir injection in Amravati)  त्यानंतर आता अमरावतीतही आज सलग दुसऱ्या इंजेक्शनसाठी सकाळपासूनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकलसमोर मोठी रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

दरम्यान, कोल्हापूर येथेही राज्यात  रेमडेसिवीरचा (Remdesivir Injection) तुटवडा आहे. (Shortage in Kolhapur) मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत दिसून येत आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत लोकांना आश्वासित केले आहे. येणाऱ्या काळामध्ये ही तफावत कमी करण्यात येईल. यामध्ये नक्की सुधारणा दिसेल, असे ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातही  रेमडेसिवीर औषध उपलब्ध केले जाणार आहे.  रेमडेसिवीर च्या वापराचे प्रमाण खासगी रुग्णालयात जास्त दिसून येत आहे.  रेमडेसिवीर किती प्रमाणात वापरावे याबाबत खासगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.