मुंबई : कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या दहवीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. तर बारावीचे शेवटचे पेपर रद्द करण्यात आले होते. यावर्षी आता दहवी आणि बरावीची लेखी परीक्षा होणार आहे. यासंदर्भातील महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना होऊ नये म्हणून सर्व ती काळजी घेऊन दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे. तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. तर विद्यार्थ्यांना 3 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अनेक तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात. मात्र आता 3 मार्च पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
दहवीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही.
शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.