दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार परीक्षा

दहवी बारावीच्या परीक्षांसंदर्भात सर्वात मोठी बातमी

Updated: Dec 16, 2021, 06:52 PM IST
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार परीक्षा title=

मुंबई: महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा. कारण 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.  10 वी 12 परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे. 

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणं महत्त्वाचं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यात.

बारावीची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहेत. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असून प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार  ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. २५ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

या परीक्षा कशा होणार केंद्र कोणती असणार? कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा कशा होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.