अठरा दिवसात तब्बल 16 हत्या, का वाढतेय या शहरातील हत्यांचे प्रमाण?

शहर आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ११ मे ते २९ मे दरम्यान या घटना घडल्या आहेत. त्यात एका स्त्रीसह १५ युवकांचे किरकोळ कारणांमुळे खून झाले आहेत.

Updated: May 30, 2022, 09:30 AM IST
अठरा दिवसात तब्बल 16 हत्या, का वाढतेय या शहरातील हत्यांचे प्रमाण? title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : खुनासोबतच जिवे मारण्याचा प्रयत्न, हाणामारीचे सर्रास प्रकार नाशिक जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडलाय.

शहर आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ११ मे ते २९ मे दरम्यान या घटना घडल्या आहेत. त्यात एका स्त्रीसह १५ युवकांचे किरकोळ कारणांमुळे खून झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात अठरा दिवसात 16 खून झाले आहेत. शहरात गेल्या 12 दिवसांत कौटुंबिक कारणातून, कुरापत काढून किंवा क्षणिक रागाच्या भरात सहा जणांचा आपला जीव गमवावा लागलाय तर ग्रामीण भागातही 10 खून झाले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या 16 पैकी सात हत्या या कौटुंबिक कारणांमधून झाल्या आहेत. त्यात दोन मुलांचा त्यांच्याच वडिलांनी, पती - पत्नींनी एकमेकांचा खून केला आहे. तर इतर खून मित्र, अनैतिक संबंध, चेष्टामस्करी, क्षणिक कारणांमधून झाले आहेत.

कौटुंबिक व सार्वजनिक ठिकाणावरील हिंसा, क्षुल्लक कारण, राग आणि संतापाच्या भरात जीवे मारण्याचे प्रकार वाढत असून हा एक चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे होणाऱ्या हत्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.