Mumbai Crime News: सोसाटीतील सदस्य आणि त्याच्यातील वाद काही नवा नाही. अनेकदा सोसायटीतील सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मुंबईत एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीतील मीटिंग मधील वाद सभासदाला चांगलाच महागात पडला आहे. सोसायटीच्या अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठा चावून तोडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका सोसायटीच्या मासिक बैठकीत दरम्यान झालेला वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाला आहे. सोसायटीच्या मीटिंग दरम्यान झालेल्या वादात एका सभासदाला आपला अंगठाच गमवावा लागला आहे.
अध्यक्षा सोबत झालेल्या बाचाबाचीत अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा चावा घेतल्यामुळे अंगठा हातापासून वेगळा झाला आहे. हा गंभीर प्रकार दहिसर पश्चिमेकडील मात्रेवाडी अमरनाथ अपार्टमेंट मध्ये घडला आहे. सोसायटीचे सदस्य असलेल्या आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात वाद झाला या वादात आदित्य देसाई यांचा अंगठा अध्यक्ष नित्यानंद परिवार यांनी चावून हातापासून वेगळा केला आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिकच्या तपास करत आहेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.