Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात किती रुग्ण?

राज्यात आज एकूण 13 हजार 27 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत.   

Updated: Jul 5, 2021, 09:40 PM IST
Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत  घट, दिवसभरात किती रुग्ण? title=

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ-घट कायम होती. महाराष्ट्रात दररोज 9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. मात्र आज कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. राज्यात आज (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 740 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. (in maharashtra today 5 july 2021 6 thousand 740 corona patients found)  

राज्यात आज एकूण 13 हजार 27 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. तर आतापर्यंत एकूण 58 लाख 61 हजार 720 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीय. त्यामुळे राज्यामधील रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा 96.02%  इतका झालाय.     

मृतांच्या संख्येत मोठी घट

राज्यात आज कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात घट झालीये. मृतांचा आकडा हा थेट दुहेरी आकड्यावर आलाय. राज्यात दिवसभरात 51 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय.  सध्या राज्यात 6,42,253 व्यक्ती होम क्वारटाईनमध्ये आहेत तर 4,233 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. 

मुंबईतही रुग्णसंख्येत घसरण? 

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होतेय. आज मुंबईतील कोरोनाचा आकडा हा 500 पेक्षा कमी आहे. मुंबईत एकूण 489 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 645 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  मुंबईचा रिकव्हरी रेट हा 96 टक्के इतका आहे. मुंबईत  7 हजार  947 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे.