पुणे : पुण्यात हडपसर इथल्या एलेक्स रुग्णालयातील लिफ्टमध्ये १३ कर्मचारी तब्बल साडेतीन तास अडकले होते. मात्र अग्निशमन दल आणि लिफ्ट कर्मचाऱ्यांकडून अखेर या सर्वांची सुटका करण्यात यश आलं आहे. या सर्वांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड परिश्रम करावे लागले. ३ अग्निशमन वाहनं या कामासाठी आली होती. अग्निशमन दल आणि लिफ्ट कंपनीचे कर्मचारी या सर्वांनी अखेर या १३ जणांची सुटका केली.
पुणे - लिफ्टमधून 13 जणांची सुटका
हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकले होते
साडे तीन तासानंतर लिफ्टमधून सुटका https://t.co/HOK58cBO5u— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 31, 2019
नोबेल रुग्णालयाच्या अगदी बाजूला असलेल्या एलेक्स रुग्णालयात ही घटना घडली. सकाळी ७ वाजल्यापासून रुग्णालयाचे कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले होते. लिफ्टमधून सुटका होण्याआधी कर्मचाऱ्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.