पुणे : Pune corona : राज्यात कोरोनाचा ( Coronavirus) धोका कमी होत असताना पुण्यातून चिंता व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
पुण्यातील रुग्णसंख्या वाढल्यास नवीन नियम लागतील, असा इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातील बैठकीनंतर दिला होता. पुण्यात मागील 4 दिवसांपासून उच्चांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद होत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 8301 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 45 हजारांवर गेली आहे. या पर्शवभूमीवर आजच्या बैठकीत काय निर्णय होतो ते महत्वाचं ठरणार आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय येत्या सोमवारपासून सुरु होणार का याबाबत उत्सुकता आहे. पुण्यातील विधानभवनात सकाळी 11.15 वाजता कोरोनाबाबत ही आढावा बैठक होणार आहे.
21 जानेवारी रोजी दिवसभरात 8301 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ दिसून आली. तर दिवसभरात रुग्णांना 5480डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरात करोनाबाधीत चार रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील सहा असे एकूण दहा जणांना मृत्यू झाला. 297 ॲाक्सिजनवर उपचार सुरु आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 47 असून नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 27 रुग्ण आहेत. पुण्यात एकूण पॅाझिटिव्ह रुग्णसंख्या 591834 इतकी आहे.