प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एक अनोखा उपक्रम

या उपक्रमात मानवी साखळीच्या मध्यामातून भारताचा नकाशा साकारण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 26, 2018, 12:16 AM IST

पुणे :  पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमात मानवी साखळीच्या मध्यामातून भारताचा नकाशा साकारण्यात आला.

१८००  विद्यार्थ्यांचा सहभाग

ज्यामध्ये संस्थेच्या विविध महाविद्यालयातील तब्बल १८००  विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. सध्याचं समाजातील वातावरण आणि विविध जातींमधील भेदाभेद विसरून देश हितासाठी तरुणांनी एकत्र यावं या उद्देशानं या उपक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.

मानवी साखळीतून भारताचा नकाशा 

यावेळी पुण्यातील एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे हे उपस्थित होते. मानवी साखळीतून भारताच्या नकाशा आणि तो ही तीन रंगामध्ये साकारण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गेला महिनाभर हे विद्यार्थी सराव करत होते.